Failed Kidnapping Attempt in Chhatrapati Sambhajinagar

शहरातील सिडको परिसरात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वराजनगर येथील एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न दोन दुचाकीस्वारांनी केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला.

ही घटना पुंडलिकनगर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर सकाळी घडली. शाळेत जाणाऱ्या मुलीच्या दिशेने बुलटवरून आलेल्या दोन इसमांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. काही समजण्याच्या आतच एका आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि दुसऱ्याने तिला उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिक अशोक दामले, सुर्यकांत जाधव, दिलीप हरणे आणि इतरांनी मोठ्या आवाजात आरडाओरड केली. त्यामुळे घाबरून गेलेल्या आरोपींनी मुलीला तिथेच सोडून दिले आणि जयभवानीनगरच्या दिशेने पलायन केले.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण किडनॅपर पळून जात असताना “कटा काड, कटा काड” असे शब्द उच्चारत होते आणि “एक-एकाला बघून घेऊ” असे धमकीवजा वक्तव्य करत निघून गेले. या घटनेने संपूर्ण सिडको भागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पीएसआय भालेराव या प्रकरणाचा तपास करत आहेत. नागरिकांनी अशा घटना घडू नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,946 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क