Month: July 2025

हरवलेले १५ महागडे मोबाइल जवाहरनगर पोलिसांनी शोधले; तक्रारदारांच्या डोळ्यात आनंदाश्रू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल १५ महागडे मोबाइल फोन शोधून मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. या कारवाईमुळे तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले…

समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर कर्मचाऱ्याने केला सहकाऱ्यावर गोळीबार 

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील सावंगी येथील टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून थेट गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात भारत घाटगे (कर्मचारी) हे गंभीर जखमी झाले असून,…

आंबेलोहळमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद खून; परिसरात खळबळ

वाळुज महानगर : आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे आज (शनिवारी ) सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अर्जुन रतन प्रधान (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून,…

जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; ६० वर्षीय महिलेच्या पोटातून ७.१५ किलोचा गोळा काढला

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी एका ६० वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल ७.१५ किलो वजनाचा ओव्हरियन सिस्ट (गोळा) यशस्वीरित्या काढण्यात आला. खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी दीड ते दोन…

मोंढा नाका ते API कॉर्नर रोडवरील 180 अतिक्रमणं हटवली, सोमवारपासून पुन्हा कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने जालना रोडवर अतिक्रमणविरोधी मोठी मोहीम राबवली. शुक्रवारी सकाळपासून मोंढा नाका ते एपीआय कॉर्नरपर्यंत झालेल्या मोहिमेत…

“डिजिटल अरेस्ट”चा बनाव करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ७८ लाखांची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक रूप घेत आहेत. डिजिटल अरेस्टचे भय दाखवून लाखो रुपये लाटण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘स्मार्ट पार्किंग’ अ‍ॅप्लिकेशन लवकरच सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट पार्किंग’ नावाचे अत्याधुनिक अ‍ॅप्लिकेशन लवकरच सुरू होणार आहे. या अ‍ॅपद्वारे नागरिकांना पार्किंगची जागा…

🔯 राशी म्हणते काहीतरी खास घडणार आहे आज! तुमचं भविष्य काय सांगतंय? 🔯

आजचे राशीभविष्य 11 जुलै 2025 : ♈ मेष (Aries): आज तुमच्यातील आत्मविश्वास अधिक तेजस्वी होईल. व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. कौटुंबिक सौख्य मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. ♉ वृषभ…

‘शास्ती से आझादी’ योजना : १५ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना ९५% व्याजमाफी

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर थकवणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने ‘शास्ती से आझादी’ ही विशेष योजना जाहीर केली असून, १५ जुलै ते १५ ऑगस्ट या…

विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न – वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप, चिठ्ठी व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव पदावर कार्यरत असलेल्या हेमलता ठाकरे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क