छत्रपती संभाजीनगर :  सायबर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक रूप घेत आहेत. डिजिटल अरेस्टचे भय दाखवून लाखो रुपये लाटण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला असून, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला बनावट आरोप आणि खोट्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तब्बल ७८ लाख ६० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

या प्रकरणात अधिक माहिती अशी की, शहरातील वृद्ध दांपत्याला २ जुलैपासून संशयास्पद फोन कॉल्स येऊ लागले. कॉलवर सांगण्यात आले की, दहशतवाद्यांच्या खात्यातून त्यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा झाले असून, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. त्यांना अटक होऊ शकते, असा धाक दाखवत त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचा बनाव केला गेला.

विशेष बाब म्हणजे, आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या AI निर्मित व्यक्तीरेखेचा व्हिडिओ कॉलद्वारे वापर करण्यात आला, ज्यामुळे संबंधित वृद्धाने विश्वास ठेवून सहकार्य केले. या सहा दिवसांच्या कालावधीत, २ जुलै ते ७ जुलैदरम्यान, वृद्ध दांपत्याकडून सायबर गुन्हेगारांनी एकूण ७८ लाख ६० हजार रुपये उकळले.

याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलिस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा डिजिटल अरेस्टसारख्या गोष्टींसाठी पैसे मागत नाही. त्यामुळे कोणतीही संशयास्पद माहिती, फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉल आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डीसीपी प्रशांत स्वामी यांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,013 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क