Fake Accident Robbery on Golatgaon-Kaudgaon Road

छत्रपती संभाजीनगर : लुटारूंनी अपघाताचा बनाव रचून मदतीसाठी थांबलेल्या कारचालकाला तब्बल साडेसात लाखांना लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली. शेकटा येथील गोलटगाव-कौडगाव रस्त्यावर हा प्रकार घडला.

बबन दाभाडे यांनी एका पोकलेन मशीन खरेदीचा सौदा ठरवला होता. बुधवारी सकाळी ते शेंद्रा एमआयडीसीत रक्कम घेऊन गेले. मात्र, काही कारणास्तव व्यवहार न झाल्याने रात्री परतत असताना खदानजवळ त्यांना दोन दुचाकी व दोन जण रस्त्यावर पडलेले दिसले. अपघात झाल्याचे वाटून ते मदतीसाठी थांबले.

काच खाली करताच एका लुटारूने चाकू लावून पैसे मागितले. त्यानंतर दाभाडे यांना कारबाहेर खेचून मारहाण करण्यात आली. इतर तीन लुटारूंनी वाहनातील साडेसात लाख रुपये उचलले आणि मोटारसायकलवरून पळ काढला.

जखमी अवस्थेत बबन दाभाडे यांनी करमाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,154 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क