छत्रपती संभाजीनगर : पाणीटंचाईच्या प्रश्नावर ठाकरे गटाने छेडलेल्या “लबाडांनो, पाणी द्या” या आंदोलनाचा समारोप आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज शहरात भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाचे नेतृत्व युवानेते आदित्य ठाकरे स्वतः करणार आहेत.

मोर्चाला शहरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, दुपारी 4.30 वाजता क्रांती चौकातून हा मोर्चा निघणार आहे. गेल्या महिनाभरापासून ठाकरे गटाने शहर व परिसरातील पाणीटंचाईविरोधात आंदोलन सुरू केले होते. विविध भागांत जनजागृतीसह ठिकठिकाणी आंदोलने, घोषणाबाजी आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरण्याचे कार्यक्रम राबवले गेले.

आजच्या मोर्चात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली जाणार आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणाविरोधात हे आंदोलन तीव्र होत असून, शहरवासीयांच्या मुलभूत हक्कांसाठी ठाकरे गट मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

971 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क