छत्रपती संभाजीनगर : सिडको-वाळूज महानगर परिसरात भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दिली आहे.

पहिली घटना रिद्धी रेसिडेन्सी, मधुर कॉलनी, सिडको-वाळूज महानगर क्रमांक १ येथे राहणारे ज्ञानेश्वर शेषराव कांडेकर (वय ४१) यांच्या घरी घडली. कांडेकर हे खासगी कंपनीत नोकरी करतात. दिवाळी खरेदीसाठी ते ११ ऑक्टोबर रोजी दुपारी पत्नी ज्योती आणि मुलगा तेजस यांच्यासह शहरात गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता परतल्यावर त्यांनी पाहिले असता घराचा दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घरातील दोन्ही बेडरूममधील कपाटांचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व रोख २० हजार रुपये असा एकूण २ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. त्यात २६ ग्रॅम वजनाचे गंठण, १२ ग्रॅम झुंबर, नथ, वेल, ठुसी, बाळ्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम यांचा समावेश आहे.

दुसरी घटना बी-३, बजाजनगर, पाटील भोंडवे शाळेजवळ घडली. अंजली अमोल जोशी (वय ४२) यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत तोडले. या घरातून सुमारे १५ हजार रुपयांची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरीस गेली. दोन्ही घटना दुपारपासून सायंकाळपर्यंतच्या वेळेत घडल्या असून, चोरट्यांनी बंद घरांची रेकी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनांमुळे वाळूज परिसरात नागरिकांमध्ये चोरट्यांविषयी भीती आणि प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी वाढली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,002 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क