छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर मंगळवारी (१४ ऑक्टोबर) रात्री उशिरा एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाची ओळख सुरेश भगवान उंबरकर (वय २७, रा. भानुदासनगर, मूळ जाफराबाद जि. जालना) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास सेंट फ्रान्सिस स्कूलसमोरील दुकानदारांनी मैदानाच्या मागील बाजूस एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला पाहिला आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता उंबरकर यांचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला आढळला. शरीरावर गंभीर जखमा असल्याचेही आढळले.

घटनास्थळी पोलिसांसह फॉरेन्सिक पथक पोहचत रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, संभाजी पवार, कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

मृत सुरेश उंबरकर हे छत्रपती संभाजीनगरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होते. घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आक्रोश केला. दरम्यान, रात्री उशिरा परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता.

पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात कोणतेही संशयित हाती लागले नसले तरी पोलिसांनी काही संशयितांवर लक्ष केंद्रित केल्याचे समजते. या हत्येने शहरात पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,650 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क