छत्रपती संभाजीनगर  : शहरात तोतया पोलिसांचा वावर वाढत असून नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक आणि लुटमारीच्या घटना घडत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकारात नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांच्या सासू रेखा शिवकिशोर त्रिवेदी यांना भामट्यांनी पोलिस असल्याचे भासवून लुटल्याची घटना पैठण रोडवरील संताजी हौसिंग सोसायटी परिसरात घडली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेखा त्रिवेदी (वय ५८) या सामाजिक कार्यकर्ते सुमित त्रिवेदी यांच्या आई आहेत. मंगळवारी (१० जून) सकाळी सुमारे ८.४५ वाजता त्या परिसरातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपून त्या सप्तश्रृंगी माता मंदिराकडे पायी जात असताना वाल्मी नाका परिसरात दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना अडवले. ‘तुम्हाला तो माणूस बोलावत आहे’ असे सांगत त्याने त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेले.

तेथे उभ्या असलेल्या दुसऱ्या भामट्याने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत काही ओळखपत्र दाखवले. त्यानंतर ‘सरकारचा नवीन नियम लागू झाला आहे. हातात सोन्याच्या बांगड्या घालून सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास दोन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो,’ अशी भीती त्याने रेखा त्रिवेदी यांच्या मनात निर्माण केली. याच दरम्यान आरोपीने त्यांच्या तोंडाजवळ एक कागद धरला. त्यानंतर त्यांना अचानक गुंगी आल्यासारखे वाटू लागले.

या संधीचा फायदा घेत भामट्यांनी त्यांच्या हातातील सुमारे सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या तसेच १५ हजार रुपये असलेले पाकीट हिसकावून पलायन केले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर त्रिवेदी यांनी हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचे हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

443 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क