Tag: #ChhatrapatiSambhajinagar

‘माझा एक लाडू माझ्या पांडुरंगाला’ उपक्रमात अवघ्या ५ तासांत १.३० लाख लाडू; वारकरी सेवेचा अनोखा विक्रम

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वारकरी सेवा चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माझा एक लाडू माझ्या पांडुरंगाला…’ हा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला. रविवारी (१९ जुलै) जालना रोडवरील पाटीदार भवन येथे…

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी? आज होणार निर्णय; महायुतीत उत्सुकता शिगेला

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड आज (सोमवार, २० जुलै) होणार असून, महायुतीतील कोणत्या पक्षाच्या संचालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले…

हनुमान टेकडीवर तरुणींची छेडछाड; विरोध करणाऱ्या मित्रावर बिअरच्या बाटलीने हल्ला, पोलिस ठाण्यातही राडा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध हनुमान टेकडी परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. फिरण्यासाठी आलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणींची मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने छेड काढल्याची घटना घडली.…

‘एपीके’ फाईल उघडताच निवृत्त अभियंत्याच्या खात्यातून तब्बल २४.७९ लाख रुपये लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलवर आलेली ‘एपीके’ फाईल अधिकृत असल्याचा समज करून ती उघडणे महावितरणच्या एका निवृत्त कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले. फाईल…

“विश्वासाची परतफेड” : ग्रामीण पोलिसांनी शोधून दिले 130 हरवलेले मोबाईल; अनेकांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा ग्रामीण पोलिसांनी नागरिकांच्या विश्वासाला सार्थ ठरवत तब्बल 130 हरवलेले आणि गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द केले. सुमारे 22 लाख 73 हजार 972…

बजाजनगरातील स्वामी समर्थ मंदिरात अज्ञात चोरट्यांचा धाडसी डाव; ७ ते ८ लाखांचा ऐवज लंपास, CCTV चा DVRही गायब

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील बजाजनगर परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष…

मंदावलेल्या पाणी योजनेसाठी नवे वेळापत्रक सादर करा; मुख्यमंत्री फडणवीस : मुंबईत घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा वेग मंदावल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा मुंबई येथे आढावा घेत संबंधित यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत. कामाच्या गतीबाबत नाराजी…

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे दमदार पुनरागमन; शहरासह परिसराला दिलासा

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात तब्बल आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सायंकाळी पावसाने दमदार पुनरागमन केले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वाढलेला उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले…

१५ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीनगरकरांना एसी ई-बसेसची भेट; जुलैअखेरपासून ३५ बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन प्रा. लि. यांच्या वतीने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार शहराला ३५ वातानुकूलित (एसी) ई-बसेस मिळणार…

सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांचे दागिने आणि रोकड चोरीला; पोलिसांनी २४ तासांत उलगडला गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सुरक्षित आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या मुक्कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या शासकीय सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेस्ट हाऊसच्या व्हीआयपी सूटमध्ये राहण्यासाठी आलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क