Tag: वैजापूर

कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याचा ग्राहकाचा आरोप; वैजापूरमधील मिठाई दुकानाच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न, FDA कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळून आल्याचा…

जायकवाडी धरणाकडे ४८ तासांत १० टीएमसी पाण्याची धाव; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गंगापूर, दारणा, कडवा आणि भावली या प्रमुख धरणांतून…

वैजापूर तालुक्यात छोट्या विमानाच्या वारंवार गिरट्यांनी नागरिकांमध्ये संभ्रम; अखेर प्रशासनाने सांगितले नेमके कारण

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव परिसरात आज सकाळपासून एका छोट्या विमानाच्या वारंवार गिरट्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. विमान कमी उंचीवरून परिसरात सतत फिरत असल्याने…

वैजापूर शिवारात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : आर्किटेक्टचा होरपळून मृत्यू, पत्नी-मुलगी जखमी

वैजापूर : समृद्धी महामार्गावर वैजापूर शिवारात सोमवारी (दि. १३) सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव कार आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत कारला आग लागून छत्रपती संभाजीनगर येथील आर्किटेक्ट पवन वर्धमान…

जिल्ह्यात एसीबीची धडक कारवाई; वैजापूरमध्ये ‘फोन पे’वरून लाच घेताना जलसंधारण अधिकारी रंगेहाथ, सोयगावात पोलिस पाटलाचा साथीदार ताब्यात तर मुख्य आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दोन स्वतंत्र कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली. वैजापूर येथे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ऑनलाइन ‘फोन पे’द्वारे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात…

वैजापूर तालुक्यात २७ लाखांचा अफू साठा जप्त; शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ९ हजार २२५ रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली. शनिवारी (दि. २१) राबविण्यात आलेल्या कोंबिंग…

वैजापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : “लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक”

छत्रपती संभाजीनगर : “लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि जास्तीत जास्त मतदान अत्यावश्यक आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेला सक्षम करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी…

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग; नदीकाठच्या १३ गावांतून बचाव कार्यास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे धरणातून तब्बल दोन लाख २६ हजार क्युसेक वेगाने…

छत्रपती संभाजीनगर-अंकाई रेल्वे दुहेरीकरणासाठी भूसंपादन सुरू; 350 शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार ?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते अंकाई या ९२ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठीची कामे वेगात सुरू झाली आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे वाहतुकीत मोठी सुधारणा होणार असून, प्रवासी आणि मालवाहतूक…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : महिला ठार, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी

वैजापूर : समृद्धी महामार्गावर मंगळवारी सकाळी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूनम चव्हाण (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला असून, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क