Category: क्राईम

लग्नाच्या नावाखाली ३ लाखांची फसवणूक; नवरी कारमधून उतरून दुसऱ्या कारने फरार

अहिल्यानगर जिल्ह्यात एका २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याची लग्नाच्या आमिषाने मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘स्त्रीधन’ म्हणून ३ लाख रुपये उकळल्यानंतर नवरी म्हणून आणलेली मुलगी रस्त्यातच कारमधून उतरून…

सातारा परिसरातील खंडोबा मंदिरात महिला चोरट्यांचा थैमान; तीन तासांत ८ महिलांच्या दागिन्यांची लूट

छत्रपती संभाजीनगर : साताऱ्यातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात यात्रेनिमित्त रविवारी मोठी गर्दी झाली असताना महिला चोरट्यांच्या टोळीने भाविकांना लक्ष्य करत मोठा आर्थिक तोटा केला. दुपारी फक्त तीन तासांच्या कालावधीत तब्बल आठ…

रुग्णालयात मृत महिला रुग्णाचे दागिने गायब; नातेवाईकांचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चोरीचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : उपचार सुरू असताना मृत झालेल्या महिला रुग्णाच्या अंगावरील चार तोळे सोन्याचे दागिने रहस्यमयरीत्या गायब झाल्याची धक्कादायक घटना शहरातील जे.जे. प्लस रुग्णालयात उघडकीस आली आहे. या दागिन्यांची किंमत…

मध्यवर्ती बसस्थानकातील बाइक चोरी प्रकरण उघडकीस; क्रांतीचौक पोलिसांकडून दोन चोरटे अटकेत, चोरीच्या ८ मोटारसायकली हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून झालेल्या बाइक चोरीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या…

सायबर भामट्याचा हॉटेल व्यावसायिकाला १० लाखांचा ऑनलाईन गंडा; कोणताही ओटीपी न आला तरी ९ व्यवहार

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा सायबर गुन्ह्याने धक्कादायक स्वरूप घेतले आहे. कोणताही मेसेज किंवा ओटीपी न मिळाल्यानंतरही एका हॉटेल व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल १० लाख २३ हजार ४६४ रुपये परस्पर काढून घेण्यात…

प्रेयसीच्या खर्चासाठी विद्यार्थ्याने चोरल्या १४ दुचाकी; जवाहरनगर पोलिसांनी त्रिकुटाला केली अटक

छत्रपती संभाजीनगर : प्रेमासाठी तरुण-तरुणी अनेकदा वेडेवाकडे निर्णय घेतात. मात्र, शहरात उघडकीस आलेल्या एका घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी एका बीएच्या विद्यार्थ्याने तब्बल १४ दुचाकी चोरी केल्याचे…

दौलताबाद ठाण्यातील महिला हवालदार लाच घेताना रंगेहात; एसीबीची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : पतीने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यातील महिला हवालदार लता बाळासाहेब दराडे (३७, रा. अॅमरॉड…

टोळक्याकडून दोन तरुणांना पेट्रोल पंपावर बेदम मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मारहाणीच्या धक्कादायक प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज आता समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या पिकअप वाहनाच्या चालकासोबत…

विद्यापीठात भाचीला सोडून घरी परतताना संशोधकाचा दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात संशोधक आणि महाविद्यालयीन प्राध्यापक ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७, रा. विद्युत कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची चार वर्षांची मुलगी…

पोक्सोच्या गुन्ह्यात सात महिन्यांपूर्वी घाटीतून पळालेला आरोपी आईला भेटायला येताच अटकेत!

छत्रपती संभाजीनगर : पोक्सो आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असताना घाटी रुग्णालयातून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेला आरोपी सोहेल अब्दुल रज्जाक कादरी (२७, रा. विश्रांतीनगर) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क