Category: क्राईम

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी MIDC पोलिसांच्या जाळ्यात; तिघांना अटक, शस्त्रसाठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सोमवारी रात्री चिकलठाणा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर कारवाई करून तिघांना अटक केली. अंधाराचा फायदा घेत दोघेजण फरार झाले असून…

खऱ्या मणीचा दाखला देत २ किलो खोट्या सोन्याच्या माळेतून व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : खऱ्या सोन्याच्या एका मणीचा दाखला देत दोन मजुरांनी व्यापाऱ्याची २ किलो खोट्या सोन्याच्या माळेतून तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छावणीतील नेहरू चौकात…

रामराई शिवारातील शेतवस्तीवर दरोडा; तिघे गंभीर जखमी, ४८ हजारांचा ऐवज लंपास

वाळूज : वाळूज औद्योगिक वसाहतीलगतच्या रामराई शिवारातील एका शेतवस्तीवर रविवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तोंड बांधून हल्ला करत घरातील तीन व्यक्तींना…

जेवणातून विषबाधा : वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू, १३ मजूर रुग्णालयात उपचाराधीन

पैठण : पैठण शहराजवळील शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ३३ वर्षीय ललिता पालवीया या महिलेचा मृत्यू झाला असून, १३…

कार उलटून भीषण अपघात; अडीच वर्षांच्या चिमुरडीसह महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगावजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. वेगात असलेली कार अचानक पलटी झाल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.…

रस्त्यावर पैसे पडल्याचा बनाव करून माजी सैनिकाची ६.८० लाखांची रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर पैसे पडल्याची थाप मारून माजी सैनिकाच्या दुचाकीवर ठेवलेली ६ लाख ८० हजारांची रोकड चार चोरट्यांनी लंपास केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १४) दुपारी सव्वाचार ते…

बजाजनगरातील उच्चभ्रू वसाहतीत धाडसी दरोडा – ४० किलो चांदी व ८ किलो सोन्याची लूट

गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : वाळूज परिसरातील बजाजनगर येथील उच्चभ्रू वसाहतीत एका उद्योजकाच्या बंद घरावर सहा दरोडेखोरांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून तब्बल ४० किलो चांदी व ८ किलो सोन्याची…

३० रुपयांच्या पेट्रोलवरून वाद, टोळक्याचा पंप कर्मचाऱ्यांवर हल्ला; १.३७ लाखांची लूट

छत्रपती संभाजीनगर : केवळ ३० रुपयांच्या पेट्रोलवरून पेटलेला किरकोळ वाद गंभीर रूप धारण करत सोमवारी रात्री चिकलठाणा परिसरातील झाल्टा शिवारात एका पेट्रोल पंपावर टोळक्याने धडक देत दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.…

‘युद्धजन्य परिस्थिती आहे’ सांगत वृद्धेची फसवणूक; गारखेड्यात चोरट्यांनी ९ तोळ्यांचे दागिने लंपास केले

छत्रपती संभाजीनगर : “देशात युद्धजन्य परिस्थिती आहे, अंगावर दागिने घालून फिरू नका,” असा सल्ला देत पोलिस असल्याचे भासवून दोन चोरट्यांनी ७५ वर्षीय वृद्धेची फसवणूक केली. गारखेडा परिसरात सोमवारी सकाळी अकराच्या…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : महिला ठार, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी

वैजापूर : समृद्धी महामार्गावर मंगळवारी सकाळी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूनम चव्हाण (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला असून, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क