Month: May 2025

‘फोन-पे’वर घेतली लाच; सेवानिवृत्तीस अवघे दीड वर्ष उरलेल्या फौजदाराला एसीबीकडून अटक

छत्रपती संभाजीनगर : वाळू, खडी वाहतुकीसाठी १ हजार रुपयांची लाच ‘फोन-पे’द्वारे स्वीकारणाऱ्या शहर वाहतूक विभागातील सहायक फौजदार अशोक वाघ (वय ५६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (१० मे) अटक केली.…

जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना बंदी ;सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी धरणावर पुढील चार दिवसांसाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय…

“१० मे २०२५: आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार?”

आजचे राशीभविष्य 10 मे 2025 : ♈ मेष (Aries) – आजचा दिवस व्यावसायिक दृष्टिकोनातून लाभदायक ठरेल. नवे प्रकल्प हाती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मन शांत व सकारात्मक…

पैठण तालुक्यात खळबळजनक घटना – वृद्धाचा मुंडके नसलेला मृतदेह विहिरीत आढळला

पैठण : चिंचाळा शिवारातील एका शेतातील विहिरीत मुंडके नसलेला वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून मृत इसमाची ओळख नामदेव…

“युद्धाचीही असते एक शिस्त: रणभूमीवर लागू होणारे जागतिक नियम”

जगाच्या पाठीवर युद्ध हे एक जुने वास्तव आहे. सत्ता, सीमाविवाद, संसाधनांवरील ताबा किंवा धार्मिक-राजकीय मतभेद यामुळे अनेक वेळा देशांमध्ये भीषण युद्धे झाली आहेत. अशा युद्धांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो, कोट्यवधींचे…

बोअरवेलची गाडी उलटली; ओडिशामधील दोन मजूर जागीच ठार, तिघे जखमी 

छत्रपती संभाजीनगर : बोअरवेलच्या गाडीचे चाक अचानक फुटल्याने गाडीवरील ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला खोलात कोसळली. या अपघातात गाडीवरील जड पाईप अंगावर पडून दोन परराज्यातील मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर…

“सायरन वाजला की अंधार होणार : प्रशासन सतर्क, ब्लॅकआउट मोहिमेची तयारी पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात संभाव्य ब्लॅकआउटसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासन ‘अलर्ट मोड’वर असून, ब्लॅकआउटची सूचना मिळाल्यानंतर पाच मिनिटांत संपूर्ण…

‘लबाडांनो पाणी द्या’ आंदोलनाचा अखेर हल्लाबोल! आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडकणार मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नावर १३ एप्रिलपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धवसेनेचे लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा समारोप १६ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या…

गोड बोलून आजीच्या गळ्यातील ९० हजारांचे दागिने लंपास; ओएसिस चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यान ऑटो रिक्षामधील प्रकार 

छत्रपती संभाजीनगर : गोड बोलून विश्वास संपादन करत एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून तब्बल ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. ओएसिस चौक…

वादळवाऱ्याच्या पावसात झाड कारवर कोसळले ; अधिकाऱ्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : बुधवारी दुपारी शहरात वादळवाऱ्यासह कोसळलेल्या जोरदार पावसामुळे विविध भागांत सहा ठिकाणी झाडे कोसळली. या दुर्घटनांमध्ये सेवा योजना कार्यालयासमोर एका झाडाखाली अडकून गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा मृत्यू झाला.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क