Aurangabad-Unusual-Theft-Request

चोरीच्या थरारक घटनांबद्दल आपण नेहमी ऐकतो. मात्र, सिडको एन-८ भागात एका वेगळ्याच प्रकारचा चोर समोर आला आहे. या चोरट्याने चोरी करण्यासाठी थेट वृद्ध महिलेची विनंती केली आणि तिने नकार दिल्यावर तो शांतपणे खिडकीतून उडी मारून पसार झाला. हा प्रकार रविवारी (९ फेब्रुवारी) पहाटे अडीच वाजता घडला.

सेवानगर सोसायटीतील एका बंगल्यात चोरट्याने पाईपच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर चढून खिडकीतून प्रवेश केला. घरात एकट्या असलेल्या ७० वर्षीय सुरेखा जोशी यांना जाग आली. चोरट्याने त्यांना धमकावत गप्प बसण्यास सांगितले आणि त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले. मात्र, ते खोटे असल्याचे समजताच त्याने परत केले. त्यानंतर, “मला ३-४ हजारांची अर्जंट गरज आहे, काहीतरी द्या,” अशी विनंती त्याने जोशी यांना केली. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याचे कळताच चोरट्याने त्यांना शांत राहण्यास सांगितले आणि तो पुन्हा खिडकीतून उतरून पसार झाला.

चोरट्याने रेकी करून घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. बंगल्याच्या मागील भिंतीवरून उडी मारून तो कंपाउंडमध्ये आला होता. वरच्या मजल्यावरील खिडकी किंचित उघडी असल्याचा फायदा घेत त्याने खिडकीच्या गजांचा आणि पाईपचा आधार घेत घरात प्रवेश केला. घरात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची माहिती त्याला आधीपासूनच होती. त्यामुळे त्याने घरातीलच एक पडदा कॅमेऱ्यासमोर टाकला, जेणेकरून त्याचे हावभाव कैद होऊ शकणार नाहीत.

घटनेची माहिती मिळताच सिडको एन-७ ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी तातडीने पथकाला घटनास्थळी पाठवले. पोलिस उपनिरीक्षक हरिदास मैदाड यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना एका कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.

या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सेवानगर सोसायटीत चोरीच्या घटना वारंवार घडत असून, चोरटे रेकी करून बंगल्यांमध्ये प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,277 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क