woman-attacked-over-marriage-refusal

छत्रपती संभाजीनगर : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून विवाहित तरुणाने सिग्नलवर थांबलेल्या तरुणीवर कुन्हाडीच्या लाकडी दांड्याने वार केला. या हल्ल्यात ३५ वर्षीय तरुणीच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली. सोमवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी पुंडलिकनगर पोलिसांनी मच्छिंद्र सोनवणे (रा. टी.व्ही. सेंटर) याच्यावर गुन्हा दाखल केला.

जखमी तरुणी एन-३ मधील एका दागिन्यांच्या दालनात काम करते. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाल्याने ती आई-वडील व मुलांसह सातारा परिसरात राहते. पूर्वी ती व मच्छिंद्र एकाच जाहिरात कंपनीत काम करीत होते. त्यावेळी त्यांच्यात मैत्री झाली होती.

तरुणीने फिर्यादीत केलेल्या आरोपानुसार, मच्छिंद्र चार महिन्यांपासून तिला लग्नासाठी आग्रह धरत होता. मात्र, तिने नकार दिल्यानंतर तो शिवीगाळ करून धमक्या देऊ लागला. या प्रकरणी तिने सातारा पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती.

पाठलाग करून सिग्नलवरच हल्ला

१० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता काम संपल्यानंतर वडिलांसह घरी निघालेल्या तरुणीवर गजानन महाराज मंदिर चौकापर्यंत मच्छिंद्रने पाठलाग केला. सिग्नल लागल्याने गाडी थांबताच त्याने कुन्हाडीच्या दांड्याने तिच्या तोंडावर वार केले. त्यानंतर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत गर्दीचा फायदा घेत तो पसार झाला.

जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मच्छिंद्र विवाहित असून त्याला दोन अपत्ये आहेत. त्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सध्या तो फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार लक्ष्मण हिंगे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,595 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क