छत्रपती संभाजीनगर : फळ खरेदीसाठी जाणाऱ्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून तब्बल साठ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव बुद्रूक (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे बुधवारी (१४ ऑगस्ट) पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आडुळ (ता. पैठण) येथील फळविक्रेते व्यापारी फेरोज आय्युब पठाण हे बुधवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील भाजी मंडईत फळ खरेदी करण्यासाठी छोटा हत्ती वाहनाने (क्र. एमएच २० डीई ०७६६) निघाले होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव बुद्रूक शिवारात उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या वाहनाला अडवले.

दरम्यान, त्या दुचाकीस्वाराने फेरोज पठाण यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडे असलेली रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली. व्यापाऱ्याजवळ फळ खरेदीसाठी तब्बल ६० हजार रुपये होते. रोकड लुटल्यानंतर आरोपी दुचाकीवरून वेगाने पसार झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फेरोज पठाण यांनी मोठ्या धडकीसह चिकलठाणा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील दुकाने आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून तो अद्याप फरार आहे. पोलिसांचा शोधमोहीम सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,219 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क