छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी सलग दोन दिवस महिलांकडून मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेले चोरटे रस्त्यावर वर्दळ असलेल्या ठिकाणी महिलांना टार्गेट करून हे प्रकार घडवत आहेत. मंदिरात जाणाऱ्या आणि नोकरीसाठी निघालेल्या महिलांवर या चोरट्यांचा विशेष लक्ष्य असल्याचे दिसून येत आहे.

पहिली घटना एन-४ परिसरात घडली. उत्तरानगरीमध्ये राहणाऱ्या राखी नरळदकर (५०) या खासगी शाळेत शिक्षिका आहेत. बुधवारी (८ ऑक्टोबर) सकाळी शाळेच्या गेटसमोर उभ्या असताना दोन दुचाकीस्वार व्यक्तींनी त्यांना विचारले, ‘इथे काळे राहतात का?’ असे. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मिनी गंठण कटरने कापून घेतले आणि दुचाकीवरून पळ काढला. नरळदकर यांनी सांगितले की, हे गंठण त्यांच्या पतीने १० वर्षांपूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर भेट दिले होते आणि ते त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दुसरी घटना एन-५ परिसरातील जळगाव रोडवर घडली. येथे एन-५ रहिवासी ६० वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे शॉर्ट गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. हा प्रकार ७ ऑक्टोबर रोजी जळगाव रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

सध्या पोलिस दुचाकीस्वार चोरट्यांच्या शोधात असून नागरिकांनी सावध राहण्याचे आणि रस्त्यावर एकट्या हालचाल टाळण्याचे आवाहन केले आहे. या घटनांमुळे महिला आणि वरिष्ठ नागरिकांमध्ये घाबरल्याचे वातावरण आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक सुरक्षा वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

914 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क