छत्रपती संभाजीनगर  : जालना रोडवरील एका नामांकित वाहन शोरूमच्या वर्कशॉपमधून थार गाडी ट्रायलच्या बहाण्याने बाहेर काढून सर्व्हिस अॅडव्हायझरवर चाकूहल्ला करत गाडीसह पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दीपक विष्णू पठाडे आणि त्याच्या ‘भाऊ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत सैफ खान चांद खान (वय ३२, रा. बायजीपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. ते जालना रोडवरील रत्नप्रभा वर्कशॉपमध्ये सर्व्हिस अॅडव्हायझर म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक पठाडे याने त्याची थार (एमएच-१९ डीव्ही-४९६०) ही गाडी सस्पेन्शन, ऑइल लिकेज, बंपर आणि इतर दुरुस्तीच्या कामासाठी वर्कशॉपमध्ये दिली होती. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर गाडीचे एकूण ७८ हजार ८०७ रुपयांचे बिल तयार झाले होते.

१२ जून रोजी रात्री काम पूर्ण झाल्यानंतर सैफ खान यांनी पठाडे याला गाडी घेण्यासाठी संपर्क साधला. रात्री सुमारे नऊ वाजता पठाडे हा एका साथीदारासह वर्कशॉपमध्ये आला. बिलाची रक्कम भरल्यानंतरच अंतिम गेटपास दिला जाईल, असे खान यांनी स्पष्ट केले. मात्र, आरोपींनी आधी गाडीची ट्रायल घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर खान यांना सोबत घेऊन त्यांनी ट्रायल गेटपासवर गाडी बाहेर काढली.

दरम्यान, ट्रायलच्या नावाखाली आरोपींनी गाडी शहराबाहेर चिकलठाणा परिसरातील माँसाहेब चौकाजवळील निर्जनस्थळी नेली. तेथे साथीदाराने खान यांना शिवीगाळ करत मारहाण केली व चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात खान यांच्या डाव्या दंडाला गंभीर दुखापत होऊन चार टाके पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ढकलून थारसह पलायन केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंढे करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

417 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क