छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीसोबत मित्राला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडल्याने संतापलेल्या प्रियकराने आपल्या मित्राचा लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना काबरा नगर भागात उघडकीस आली आहे. सोमवारी (दि. ३) रात्री घडलेल्या या घटनेनंतर मंगळवारी (दि. ४) जवाहरनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. विशाल बंडू पाचकोर (३२) असे मृताचे नाव असून सुधाकर शेषराव ढेपे (४८, रा. काबरा नगर) हा अटकेतील आरोपी आहे. या गुन्ह्यात आरोपीची प्रेयसी आणि एक अल्पवयीन आरोपी देखील सहभागी असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी सुधाकर आपल्या प्रेयसीच्या घरी मद्यपानासाठी गेला होता. त्यानंतर काही वेळ बाहेर गेल्यानंतर तो पुन्हा घरी आला असता त्याला मित्र विशाल आणि त्याची प्रेयसी आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. त्याचा राग अनावर झाला आणि नशेतच त्याने विशालला घराबाहेर ओढत आणून लाकडी दांड्याने फटके मारले. यात विशालचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर आरोपी सुधाकर आणि त्याच्या प्रेयसीने घरातील रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून मृतदेह रस्त्यावर ओढत आणून फेकला व अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचताच त्यांनी तपास सुरू केला. शरीरावरील जखमांच्या स्वरूपावरून हा खून असल्याचा संशय पोलिसांना आला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपींची ओळख पटली.

जवाहरनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुधाकर ढेपे याला अटक केली असून त्याची प्रेयसी सध्या फरार आहे. तिसरा संशयित अल्पवयीन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,210 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क